चेन्नई येथील मलिय्यमबक्कम गावातील फार्म हाऊसमध्ये डॉन चुलईमेडू बिन्नूच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती.गॅंगस्टर्सच्या या बर्थ-डे पार्टीची माहिती पोलिसांना मंगळवारी गाड्यांच्या चेकींगदरम्यान मिळाली होती.पोलीस टोलनाक्यावर गाड्यांची झडती घेत होती. तेव्हाच एका कारमध्ये अनेक गॅंगस्टर्स बसून जात असल्याचे दिसले.पोलिसांना चौकशीतून माहिती मिळाली की, सर्वच डॉन चुलईमेडू बिन्नूच्या बर्थ-डे पार्टीसाठी जात होते. ही माहिती मिळताच सर्वच चौक्या आणि पोलीस स्टेशनांना अलर्ट पाठवण्यात आला. नंतर पोलिसांकडून ‘ऑपरेशन बर्ड-डे’ करण्यात आलं. पोलिसांनी जेव्हा फार्म हाऊसवर छापा मारला तेव्हा डॉन चुलईमेडू बिन्नू केक कापत होता. पोलिसांच्या धाडीची माहिती मिळताच तिथे एकच गोंधळ उडाला आणि ६७ गॅगस्टर्सना पोलिसांनी अटक केली. यावेळी केक कापताना बिन्नूने हातात शस्त्रास्त्र घेऊन फोटोही काढले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews